विक्रमगड /प्रतिनिधी :
शक्ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्थेमार्फत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हर्नोली, विक्रमगड येथे सॅनिटरी पॅड मशीन देण्यात आल्या असून त्याचा उद्घाटन कार्यक्रम दि. 25 जून रोजी पार पडला. याप्रसंगी वाकी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री चौधरी सर तसेच जिल्हा परिषद पालघर प्राथमिक शाळा ओंदेचे मुख्याध्यापक अजित भोये उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कीर्ती किरण थोरात यांनी केले. त्याचबरोबर शक्ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे संस्थापक अनुष्का झा एवं अदिति झा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या संस्थेने चार सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि चार इन्सिनेटर मशीन्स शाळेस देण्यात आल्या आहेत. या पुढेही ही संस्था असाच सहयोग करत रहाणार आहे।मानसी मॅडम यांनी मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी यासंदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. श्री अजित भोये सर यांनी मान्यवरांना शाळेबाबत माहिती दिली व विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या गृहपाल मंगला तेलगोटे यांनी युनायटेड स्टेट मधील हाई स्कूल विद्यार्थिनी अनुष्का झा, आदिती झा, इंद्रा खारीवाला यांनी ज्या उद्देशाने शक्ती इंटरनॅशनल ची स्थापना केली त्याबाबत सांगून शाळेसाठी दिलेल्या मशीन बाबत शक्ती इंटरनॅशनल चे आभार मानले. सदर कार्यक्रमास शक्ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ह्या सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय विक्रमगड येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू पिंपळके यांनी केले.