जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी शाळा सुरु होत असताना ठाणे , पालघर जिल्ह्यातील तसेच कोकण भागांत असलेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण लाखो वह्यांचे वाटप केले जाते . समाजातील प्रत्येक मुलाला शालेय तसेच उच्च शिक्षण मिळावे तो शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिजाऊ संस्थेच्या वतीने विविध उपक्रम मोफत चालवले जातात . त्यातीलच एक भाग म्हणून शैक्षणिक वर्ष चालू होत असताना संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागांत अनेक शाळांमध्ये दरवर्षी वह्यांचे वाटप केले जाते . याही वर्षी कोकणातील लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २३ जून रोजी जिजाऊ संस्था व युवा संदेश प्रतिष्ठान मौजे नाटळ सांगावे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे २ लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे . त्याचाच शुभारंभ आज कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी लंडनला असलेल्या आमदार नितेश राणे यांनी तर मुंबईतून जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी विडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात संवाद साधला . जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे ठाणे पालघर जिल्ह्यासह कोकणातील दुर्गम भागांत तळागाळातील लोकांसाठी एक वेगळ्या पद्धतीचे काम करत आहे . शिक्षण , आरोग्य , रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर काम करत आहे . त्यांचे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे यावेळी आमदार नितेश राणे विडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना म्हणाले. या प्रसंगी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे चे संस्थापक व माजी जि प अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत , जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण , परेश कारंडे, मिलिंद मेस्त्री , संजय देसाई , माजी सभापती प्रकाश पारकर, भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,नांदगाव सरपंच भाई मोरजकर , कासार्डे सरपंच नकाशे , अध्यक्ष खुरतडकर , पाताडे , डॉ . अरविंद संतोष खुरतडकर, कणकवली नगरसेवक तुरळेकर , शाळेचे मुख्यध्यापक खाडिये सर यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिजाऊ संस्थेचे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे यावेळी आमदार नितेश राणे विडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना सांगितले.