गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’चा – दिवस तिसरा दिमाखात संपन्न !
🔺 महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या विद्यमान व माजी मुख्यमंत्र्यांचा यथोचित सन्मान !
आज ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ च्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘संगम कलेचा, सन्मान संस्कृतीचा’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या विद्यमान आणि माजी मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध परंपरेचा आणि नेतृत्वांचा गौरव करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आणि राजकीय वारशाला अभिवादन करण्यासाठी केले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मा. श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते विद्यमान मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री मा. श्री. नारायण राणे, माजी मुख्यमंत्री मा. श्री. अशोक चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. तसेच, माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांचा सन्मान त्यांच्यातर्फे उपस्थित राहिलेले राज्याचे परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या गौरव सोहळ्यानंतर, सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडला.
यावेळी, माजी मंत्री मा. श्री. दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील, महिला व बालविकास मंत्री मा. ना. कु. अदितीताई तटकरे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री मा. ना. श्री. नरहरी झिरवाळ, रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री मा. ना. श्री. भरत गोगावले राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा मा. सौ. रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, मा. आ. श्री. धनंजय मुंडे, माजी मंत्री मा. श्री. अनिल पाटील, माजी मंत्री मा. श्री. गुलाबराव देवकर, मा. आ. श्री. शेखर निकम, मा. आ. श्री. पंकज भुजबळ, मा. आ. श्री. अमोल मिटकरी, मा. आ. श्री. हिरामण खोसकर, माजी आमदार मा. श्री. मुस्ताक अंतुले, युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्यासह सर्व मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
