ग्रीन सोल इंडिया ट्रस्ट तर्फे आश्रमशाळा विद्यार्थ्यांना चप्पल व दप्तर वाटप

ग्रीन सोल इंडिया ट्रस्ट तर्फे कँपनीच्या सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ,आश्रमशाळा गांडुळवाड,जि प शाळा तळवाडा, जि प शाळा चोंढे खु, जि प शाळा रोडवहाल माध्यमिक विद्यालय बामणे येथील विद्यार्थ्यांना चप्पल व दप्तर वाटप कार्यक्रम आदिवासी आश्रमशाळा गांडूलवाड ता शहापूर जि ठाणे येथे आयोजित केला होता.
प्रमुख अतिथी श्रेयश भंडारी , फौंडर ग्रीन सोल
रमेश धामी , फौंडर ग्रीन सोल अंकित सर सुदर्शन ,दिवाकर, पूनम मॅडम ,रियासात,पूजा मॅडम
आयपोमिया , डॉली ,आश्रम शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना श्रेयस भंडारी यांनी बहुमोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. फौंडेशन च्या वतीने आतापर्यंत 58 हजार विद्यार्थ्यांना चप्पल व दप्तर वाटप केले गेले आहे. पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम झाला. सुनील मेणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आश्रमशाळेत व परिसरात विविध समाजपयोगी कार्यक्रम पार पडत असतात .सुत्रसंचलन
मुख्याध्यापक सुनील मेणे सर
यांनी केले , शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *