महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन

पालघर दि. 20:
महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी पालघर जिल्हयात वसई पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. करीता दिनांक 30/06/2023 पर्यंत इच्छुक संस्थानी कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात जिल्हा महिला बालविकास अधिकारी, पालघर यांच्या कडे अर्ज सादर करावा.

अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- अर्जदार संस्था पालघर जिल्हयातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्रथम प्राधान्य असेल. संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. संस्थेस किमान ३ वर्षाचा महिला समुपदेशन क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू (MSW) उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. संस्थेची घटना व नियमावली आवश्यक, ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उददेश असावा. सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षांचा अहवाल (ऑडीट रिपोर्ट ) संस्थेचे मागील तीन महिन्यांचे माहिना निहाय बँक स्टेटमेंट जोडावे. संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शासकीय सेवेत नाहीत याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे. संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव ) त्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडावे. ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव देणे आवश्यक आहे. (सोबत आवश्यक ती कागदपत्रे पुरावा म्हणून जोडावेत.)

अधिक माहिती साठी व विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पत्ता प्रशासकीय ईमारत अ. कक्ष क्र. 108 पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बोईसर रोड, कोळगाव, पालघर (प) येथे संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले.

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी पालघर जिल्हयात वसई पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *