अभिनेते सचिन खेडेकर संचलित सोनी मराठी टिव्ही चॅनल वरील “कोण होणार करोडपती ” ही सिरियल खूपच लोकप्रिय असून सध्या या सिरियलचा दुसरा सिझन सुरू झाला आहे. या सिरियलमधील सोमवार दि. 18 जून 2023 रोजी प्रसारित झालेल्या भागात पालघर येथील कृषी विभागातील अधिकारी डॉ. सिद्धार्थ कदम यांनी भाग घेवून स्पर्धेतील अनेक टप्पे यशस्वीपणे पार केले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. सिद्धार्थ कदम हे पालघर कृषी संशोधन विभागात वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे सहाय्यक पैदासकार या पदाचा अतिरिक्त कार्यभारसुध्दा आहे. डॉ.कदम यांनी डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथून शिक्षण घेतले असून कृषी विषयात ते अनेक वर्षे संशोधन करीत आहेत.
डॉ. सिद्धार्थ कदम यांनी कृषी विषयात पी एच डी प्राप्त केली असून त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
डॉ. सिद्धार्थ कदम हे पालघर कृषी संशोधन विभागात वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे सहाय्यक पैदासकार या पदाचा अतिरिक्त कार्यभारसुध्दा आहे.