पालघर दि. 22 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा 30 ऑगस्ट रोजी प्रस्तावित पालघर जिल्हा दौरा असून केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम स्थळाची आणि हेलीपॅड स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
यावेळी श्री. सोनोवाल यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी तयार करण्यात आलेल्या हेलीपॅड आणि नियोजित कार्यक्रम स्थळाची पाहणी करून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडून सर्व तयारीचा आढावा घेतला व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारी विषयी समाधान व्यक्त केले.