शहापूर / 26 जुलै :
वासिंद – शहापूर मिनिडोर रिक्षा चालक व मालक यांच्या शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्यात शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत रिक्षाचालकांनी दररोजच्या प्रवासी वाहतूक समस्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू करणे,वासिंद व शहापूर ला कायमस्वरूपी रिक्षा स्थानक,व अन्य मागण्यांबाबत समाज सेवक संजय सुरळके, रिक्षा संघटना पदाधिकारी कृष्णा अंदाडे, ऋषिकेश खिसमतराव, मनोहर कांबळे, परेश काठोळे, सुरेंद्र रोठे, तसेच वासिंद व शहापूर परिसरातील रिक्षाचालकांनी बैठकीत सहभाग घेतला.
चर्चा वेळी तातडीने वाहतूक पोलीस निरीक्षक,वासिंद व शहापूर पोलिस निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन वरील समस्या कायमची मिटविण्यासाठी आमदार दौलत दरोडा यांनी पुढाकार घेणार असल्याचे आश्र्वासित केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे, डी के विशे, किसनराव तारमळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.