🔸 वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्यावतीने पोलिस निरीक्षक दत्तात्रेय कींद्रे यांना दिले निवेदन
शहापूर विधानसभेचे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांना उद्देशून आक्षेपार्ह मजकूर असणारा बॅनर शहापुर लावण्यात आला आहे. सदरचा बॅनर शहापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून लावण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. याबाबत वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा) यांच्याकडून संबंधित बॅनर लावणाऱ्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांना शुक्रवारी (26 जुलै) निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद पालघर महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, पंचायत समिती सदस्य जगदीश पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र पटारे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ साबळे, नंदकुमार वेखंडे, संगीत मेने, पंढरीनाथ मराडे, पंडित पटारे, युवक तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष सदानंद थोरात, युवक कार्याध्यक्ष नितीन देसले, उपाध्यक्ष वैभव पटारे यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहापूर येथे लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) असा स्पष्ट उल्लेख असून या प्रकाराची सर्वसी जबाबदारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहापूर तालुका व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तर सदरचा आक्षेपार्ह बॅनर राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरवरही प्रसारित करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत राष्ट्रवादी (अजितदादा) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून यामुळे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून शहापूरमध्ये बदनामीकारक मजकूर असणारा आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आला असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. हा बॅनर लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्यावतीने वाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
जयेश शेलार
वाडा तालुका अध्यक्ष
राष्ट्रवादी (अजितदादा)