अखिल भारतीय कुर्मी (मराठा – कुणबी) क्षत्रिय महासभेचे राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर मध्ये 6 ऑक्टोबरला संपन्न होणार.

🔸 केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी व महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर निरंजन प्रसाद यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार.

🔸राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 मान्यवरांचा कुर्मी भूषण पुरस्कार देऊन होणार सन्मान..

अखिल भारतीय कुर्मी (मराठा – कुणबी) क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन येत्या 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.00 वाजता छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होत आहे.

या अधिवेशनासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, कुर्मी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही.एस.निरंजन, राष्ट्रीय महासचिव उमेश कुमार पटेल, राष्ट्रीय महिला अध्यक्षा लता ऋषी चंद्रकार, राष्ट्रीय संरक्षक एल.पी. पटेल, राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज पाटीदार तसेच मराठा सरदार लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. कल्याणजी काळे, आमदार सतीश चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या अधिवेशनात देशभरातून 300 च्या वर पदाधिकारी उपस्थित राहणार असून या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा – कुणबी बांधवांना कुर्मी भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे महासभेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

तर राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 मान्यवरांचा कुर्मी भूषण पुरस्कार देऊन होणार सन्मान करण्यात येणार आहे, पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे :-
1) सरदार श्री विजय काकडे, (छ्त्रपती संभाजी नगर)
2) श्री अशोक तेजनकर, (छ्त्रपती संभाजी नगर)
3) श्री मनोज कदम, (छ्त्रपती संभाजी नगर)
४) श्री महेश कदम (छ्त्रपती संभाजी नगर)
५) श्री आकाशचंद्र गोर ठाकुर (छ्त्रपती संभाजी नगर)
६) श्री रखमाजी मामा जाधव (छ्त्रपती संभाजी नगर)
7) श्री सदाशिवराव जाधव (छ्त्रपती संभाजी नगर)
8) कुणबी सेवा संस्था पनवेल
9) श्री तुकाराम पष्टे (विरार, जि.पालघर)
10) श्री किसन बोंद्रे ष्टे (ठाणे)
11) हभप श्री भानुदास भोईर ष्टे (शहापूर, जि.ठाणे)
12) श्रीमती सीमा प्रेमकुमार बोके(अमरावती)
13) मराठा अधिकारी कर्मचारी कल्याण प्रतिष्ठान
14) श्री नारायण गुंडू पोवार (कोल्हापूर)

देशपातळीवर कुर्मी मधील समाज बांधवांचे शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार, अर्थकारण मजबुत करण्यासाठी आपल्या सर्वांना एकञीत घेवून अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा काम करीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनामध्ये या सर्व विषयांच्या अनुषंगाने समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टीने करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *