‘
पालघर दि. १७ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालघर जिल्ह्यातून आतापर्यत 1 लाख 34 हजार 197 महिलांनी अर्ज नोंदणी केले आहे.
जिल्ह्यातील संभाव्य पात्र महिलांची संख्या सुमारे ३ लाखाच्या जवळपास आहे. अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात एकूण 3950 केंद्र कार्यरत आहेत. जिल्ह्यातील जवळपास तब्बल ४५ टक्के महिलांकडून अल्पावधीतच अर्ज भरूण घेण्यात आल्याने पालघर जिल्हा अर्ज भरण्याच्या टक्केवारीत जलद गतीने अग्रेसर होत आहे.
. योजनेसाठी पात्र जास्तीत जास्त महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे तसेच वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वसई विरार महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रियंका राजपूत, महिला व बालविकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे , तसेच जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत. तर जिल्हा परिषद पदाधिकारी, राजकीय व सामजिक क्षेत्रातील व्यक्ती विशेष प्रयत्न करीत आहेत.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थी महिलांना मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती विशेष प्रयत्न करीत आहेत.