पालघर दि. १६ (जिमाका) : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि सलग्न क्षेत्र, फलोत्पादन क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन वाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, शेतकरी गट यांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, निलेश भागेश्वर यांनी केले
. या पुरस्कारा अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषी भूषण, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेशनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत २०२३ या वर्षासाठी वरील पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि. २२/०७/२०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करावा . विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तयार करण्यासाठी तसेच पुरस्कारा विषयी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, निलेश भागेश्वर यांनी केले आहे