महाशिवरात्रीच्या निमित्ताने राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्यावतीने वाडा तालुक्यातील तिलसे व गारगाव (धाकेदा) येथे पाणपोई व सरबत वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांसाठी मदत केंद्र ही उभारण्यात आले होते.
या उपक्रमासाठी पालघर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणीताई शेलार, प्रदेश युवक सरचिटणीस मिलिंद देशमुख, पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, तालुका अध्यक्ष जयेश शेलार, स्वीय सहाय्यक रोहिदास शेलार, संपर्क अध्यक्ष नाना साबळे, उमेश दळवी, भगवान भोईर, भालचन्द्र खोडके, नंदकुमार वेखंडे यांसह अन्य पदाधिकारी यांनी विशेष योगदान दिले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्याकडून तिलसे येथील पाणपोई मंडपात पोलीस भगिनी, सामाजिक – राजकीय व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तिलसे येथील राष्ट्रवादीच्या मंडपातील मंचावर क्वेस्ट संस्थेतील विद्यार्थ्यांनी तिलसे येथील नैसर्गिक कुंडातील देवमासे यांच्या संरक्षणबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला तसेच पालघर जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती रोहिणी शेलार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तिलसे येथील सरबत वाटप व पाणपोई उपक्रमाचा 13 हजार शिव भक्तांनी लाभ घेतला असून या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट घेवून शुभेच्छा दिल्या.