वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील विकास कामांचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते भूमिपूजन


▪️अतिदुर्गम भगतपाड्याला जोडणाऱ्या बंधारा कम पुलाचे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान

वाडा/प्रतिनीधी:

शहापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाडा तालुक्यातील गारगाव ग्रामपंचायत हद्दीतील दाभोण, मांगरुळ ग्रामपंचायत हद्दीतील सुतक पाडा येथील रस्त्यांच्यावत्र उंबरद्याचापाडा लहान पुलाच्या कामांचे भूमिपूजन आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.24 नोव्हेंबर) करण्यात आले. तर आखाडा – भगत पाडा या पिंजाळ नदीवरील बहुप्रतिक्षित बंधारा कम पुलाच्या कामाचे भूमिपूजनही आमदार दरोडा यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, सदस्या भक्ती वलटे, वाडा पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, सदस्य रघुनाथ माळी, राष्ट्रवादी (अजितदादा) तालुका अध्यक्ष जयेश शेलार, युवा नेते रोहिदास शेलार, जेष्ठ नेते भगवान भोईर, डॉ.भाई वलटे, भालचंद्र खोडका नाना साबळे, भाऊ साबळे, सुधीर पाटील, कल्पेश पाटील, गणेश भोये व शंकर पारधी यांसह स्थानिक सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाडा तालुक्यातील अतिदुर्गम आखाडा ग्रामपंचायत हद्दीतील भगतपाडा हा पिंजाळ नदीच्या पलीकडे असल्याने पावसाळ्यात येथील ग्रामस्थांचा संपर्क तुटतो तर पुल नसल्याने वाहनही त्याठिकाणी जावू शकत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक वर्षापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तसेच या नदीला बंधारा बांधण्याची मागणीही येथील ग्रामस्थ करीत होते. या अनुषंगाने आमदार दौलत दरोडा यांनी पाठपुरावा करून या ठिकाणीं बंधारा कम पुल मंजूर करून येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर केली आहे. याठिकाणी बंधारा बांधून पाणी अडविण्यात येणार असल्याने शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे तर याच बंधाऱ्या वरून वाहतूकही करता येणार असल्याने स्थानिकांची मोठी सोय होणार असल्याने स्थानिक आमदार दरोडा यांचे मनोमन आभार व्यक्त करीत आहेत.
▪️कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गारगांव ग्रामपंचायत सरपंच, साधना आरे व उपसरपंच, भानुदास डोहाळे, मागंरुळ ग्रामपंचायत सरपंच, चंद्रकांत दुधवडे, उपसरपंच, कल्पेश लोटे, आखाडा ग्रामपंचायत सरपंच, निलेश कोदे, उपसरपंच, रवी बुधर यांनी विशेष मेहनत घेतली.

आखाडा – भागात पाडा गावांना जोडणारा पिंजाळ नदीवरील बंधारा कम पुल मंजूर करून येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर केली आहे. याठिकाणी बंधारा बांधून पाणी अडविण्यात येणार असल्याने शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे तर याच बंधाऱ्या वरून वाहतूकही करता येणार असल्याने स्थानिकांची मोठी सोय होणार असल्याने स्थानिक आमदार दरोडा यांचे मनोमन आभार व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *