शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत जी दरोडा यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष पदाची पदभार सोमवारी (दि.19) रोजी विधानभवन मुंबई येथे स्वीकारला.
आमदार दौलत दरोडा हे ज्येष्ठ विधानसभा सदस्य असून तब्बल पाच वेळा शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडून आले असून उच्चशिक्षित व अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असून अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपद देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
विधानसभा अधिनियम 235 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार दौलतजी दरोडा यांची नियुक्ती करण्यात आली असून या समितीत आमदार हरिचंद्र भोये, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, आमदार केवलराम काळे, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेश पाडवी, आमदार शांताराम मोरे, आमदार मंजुळा गावित, आमदार हिरामण खोसकर, आमदार आदित्य ठाकरे, आमदार रामदास मसराम, आमदार विनोद निकोले आदी आमदारांचा समावेश आहे.
अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून मागासलेल्या जनतेच्या विकासासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार दौलतजी दरोडा यांनी व्यक्त केली आहे.

