अनेक आघात झेलून मिळालेले यश हे अविस्मरणीय असते आणि त्या यशाचा आनंद पराकोटीचा असतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली मिळालेले यश हे असेच आहे..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ विकासाच्या मुद्यावर भाजपा महायुतीत सहभागी झाला असताना, त्या सहभागाबाबत सतत शंका घेत आरोपाची राळ उडवत अजितदादा यांना बदनाम करण्याचे काम शरदचंद्र गटाच्या नेत्यांनी केले. अजितदादा यांची प्रतिमा जेवढी मलीन करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न या मंडळीनी केला. अगदी त्यांच्या प्रेस स्टेटमेंटमधील व्हिडीओची काटछाट करत अजितदादा आणि त्यांच्यासोबतच्या माणसांची इथेच्छ टिंगल टवाळी आणि बदनामी करण्याचा विडा शरदचंद्र गटाने उचलला होता.तेही कमी म्हणून की काय संजय राऊत नावाचा शब्दबंबाळ माणूस अधूनमधुन सामना मधून आपल्या ओकाऱ्या काढत, अजितदादा यांना बदनाम करत होता. राऊतने बदनामीची परिसिमा गाठली होती. त्याचे दादांच्या विरोधातील लेख वाचून मला नेहमी प्रश्न पडायचा की या पत्राचाळीतल्या आरोपीला किती रुपयांची सुपारी तुतारीने दिलीय..
असो..
दुसऱ्यांचे हात तोंड करायचे असतील तर अगोदर आपले हात काळे करावे लागतात या म्हणीचा प्रत्यय तुतारीवाल्याना आता आला असेल..
ज्याला तुम्ही राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्या प्रत्येक कृतीला वादग्रस्त ठरवले, ज्याची सतत बदनामी केली तो नेता आज देशाच्या महत्वाच्या नेत्यांच्यासोबत सल्लामसलत करतोय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज घेऊन दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसोबत बोलतोय.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा अशी चर्चा अगदी हिंदी चॅनेलसुद्धा करू लागली आहेत हे दादांचे यश असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.
कोणी वंदा कोणी निंदा
महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुखासाठी अहोरात्र कष्ट करणे हाच आमचा धंदा असं म्हणत अजितदादा रुबाबात निघालेत…