🥊
२४ ते २८जुलै २०२४ दरम्यान गोवा येथे पार पडलेल्या सीनियर्स व मास्टर्स राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये वसई तालुक्यातील देपिवली गावातील अमन प्रमोद पवार याने पदार्पणातच आपल्या वादळी खेळाच्या जोरावर राष्ट्रीय विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
त्याने ८४ किलो वजनी गटामध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये अतिशय सुरेख खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय मानांकित क्रमांक एक व दोन वरील पंजाब व गुजरातच्या सीनियर खेळाडूंना नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
अमन पवार याची निवड आता कंबोडिया येथे होणाऱ्या एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप साठी निवड झाली आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल येथे आयोजित सराव शिबिरातआंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याची संधी मिळाली आहे.
तसेच सांघिक लढतीमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना सागर भोईर व सिद्धांत मुंडापाट या अनुभवी खेळाडूंच्या साथीने सांघिक सुवर्णपदक सुद्धा मिळवले आहे.
अमन पवार याने गतवर्षी झारखंड येथे पार पडलेल्या जूनियर राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये देखील तीन सुवर्ण पदकांची कमाई करत आपल्या खेळाची छाप पडली होती.🥊