♦️.. कमलजीत धानमेहेर यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी….
राष्ट्रवादीचे नेते मा.ना. अजितदादा पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष मा. खा. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष मा.आ. आनंदभाई ठाकूर यांनी राष्ट्रवादीच्या विक्रमगड तालुका अध्यक्ष पदी प्रकाश भोये यांची नियुक्ती केली आहे. प्रकाश भोये यांची पत्नी अंजली प्रकाश भोये या विक्रमगड पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या असून प्रकाश भोये हे सातकोर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. तर जव्हार येथील कमलजीत धानमेहेर यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
वाणगाव (डहाणू) येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या एका कार्यक्रमात ही नियुक्ती करण्यात आली असून यावेळी जिल्हाध्यक्ष मा.आ. आनंदभाई ठाकूर, जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर धुम, जिल्हा सरचिटणीस किसन जाधव, सुरेश पडवळ, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष तथा वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, जव्हार तालुका अध्यक्ष वैभव अभ्यंकर, बोईसर विधानसभा संपर्क अध्यक्ष गणेश पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विक्रमगड तालुका अध्यक्ष प्रकाश भोये यांच्यासोबत विक्रमगड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात माण ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश गांगोडा, ग्रा.पं. सदस्य प्रशांत चौधरी, सातकोर ग्रा.पं. सदस्य मंगेश ठाकरे, कल्पना/ दिनेश लहारे, प्रियांका/ प्रमोद हलकारी, संतोष कुवरा, रविना/गणेश, पेसा कमिटी अध्यक्ष संतोष ठाकरे, शाळा समिती अध्यक्ष मधुकर वैजल, डोल्हारी येथील महेश खरपडे, अंकुश खरपडे, माण येथील विनायक गांगोडा यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालघर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाची संघटनात्मक बांधणी जोरदार सुरू असून भविष्यात जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते व लोकप्रतिनिधी मा.ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील, असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष मा.आ. आनंदभाई ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.