अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व कोकण विभाग पत्रकार संघाचे कोकण विभाग अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांची बदनामी करणारी पोस्ट दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी व्हाट्सअप ग्रुपद्वारे व्हायरल करण्यात आली होती. त्यामध्ये जयेश शेलार यांच्या बद्दल बदनामीकारक व मानहानी करणारा मजकूर असल्याने सदर प्रकरणी ही पोस्ट कुठून आली व कोणी जाणीवपूर्वक व्हायरल केली, त्याबद्दल चौकशी करून पोस्ट व्हायरल करून बदनामी करणाऱ्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जयेश शेलार यांनी वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गोविंद मामा विचार मंच व जय महाराष्ट्र या दोन व्हाट्सअप ग्रुपवर सदर बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आली असून या दोन्ही ग्रुप वर स्वतः जयेश शेलार हे असल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत वाडा पोलिसांकडे तक्रार करून या व्हायरल पोस्ट बाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या व्हाट्सअप ग्रुपद्वारे व अन्य सोशल माध्यमांद्वारे बेनामी पोस्टद्वारे बदनामी करण्याचे प्रकार खूपच वाढीस लागले असून याला पायबंद घालण्याची गरज असून याप्रकरणी सखोल चौकशी करून बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जयेश शेलार यांनी केली आहे.
गोविंद मामा विचार मंच व जय महाराष्ट्र या दोन व्हाट्सअप ग्रुपवर सदर बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आली असून या दोन्ही ग्रुप वर स्वतः जयेश शेलार हे असल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत वाडा पोलिसांकडे तक्रार करून या व्हायरल पोस्ट बाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.